वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी बीड येथील हॉटेल शांताई येथे महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडची मराठवाडा विभागाची जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरीताई भदाणे, प्रदेश महासचिव शिवमती स्नेहाताई खेडेकर, प्रदेश कार्याध्यक्षा शिवमती नंदाताई शिंदे, प्रदेश उपाध्यक्षा शिवमती सरस्वतीताई धोपटे, प्रदेश उपाध्यक्ष शिवमती ज्योतीताई कोथळकर, शिवमती सुजाताई चव्हाण, शिवमती विभावरीताई ताकट, प्रवक्त्या शिवमती रेखाताई सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांच्या व जिजाऊ चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास प्रथमतः अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यक्रम स्थळी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महामानवांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी यांनी केले. जिजाऊ ब्रिगेडची भूमिका आणि आढावा बैठकीची गरज, संघटन वाढ या बाबी प्रास्ताविकात त्यांनी नमूद केल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी माधुरीताई भदाणे म्हणाल्या की,” जिजाऊ ब्रिगेड हे महिलांचे राष्ट्रीय पातळीवरील भक्कम संघटन आहे. त्यामुळे प्रत्येक सामाजिक समस्यांवर आणि समाज उपयोगी कार्यावर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी कृतिशील भूमिका ठेवावी.
प्रदेश महासचिव स्नेहाताई खेडेकर यांनी जिजाऊ ब्रिगेड हा एक परिवार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी एकमेकांशी समन्वय साधून राहिले पाहिजे असे सांगितले. प्रदेश कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे यांनी महिलांनी आपापसातील हेवे दावे विसरून एकसंघ राहून जिजाऊंचे विचार कृतीतून साकारले पाहिजेत तसेच सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी हे लोकवर्गणीतून साकार करून दाखवू असे मत व्यक्त केले. सरस्वतीताई धोपटे यांनी महिलांनी कर्मकांडातून मुक्त होऊन जिजाऊंचा विज्ञानवादी विचार अंगीकारावा ही भूमिका मांडली.
बीड जिल्हाध्यक्ष वर्षाताई माने यांनी अध्यक्षीय समारोपात बीड जिल्ह्यात अधिकाधिक जोमाने विविध सामाजिक, शैक्षणिक बाबींवर जिजाऊ ब्रिगेडकडून कृतिशील कार्य होईल अशी ग्वाही दिली.
यानंतर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
१) प्रदेश प्रसिद्धी प्रमुख- रेखा नितीन सूर्यवंशी
२) प्रदेश सहसंघटक – डॉ. शितल कल्याणकर
३) प्रदेश रोजगार मार्गदर्शक- ज्योती चोरे
४) विभागीय अध्यक्ष (हिंगोली, नांदेड, परभणी)- राजश्री क्षीरसागर
५) विभागीय अध्यक्ष (कोल्हापूर, सातारा, सांगली)- सुवर्णलता गोविलकर
६) विभागीय उपाध्यक्ष- शितल मोरे
७) विभागीय संघटक- सुनंदा चव्हाण
८) विभागीय अध्यक्ष (पुणे, सोलापूर)- स्मिता म्हसकर
९) जिल्हाध्यक्ष कोल्हापूर – चारुशीला पाटील
१०) जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष – सुमन सावंत
११) महानगरप्रमुख- प्रियंका कोईगडे
१२) जिल्हा प्रवक्ता -रंजना पाटील
१३) जिल्हा संघटक उस्मानाबाद- मंजुषा चव्हाण
१४) तालुकाध्यक्ष तुळजापूर- अनिता लष्करे
१५) आष्टी तालुकाध्यक्ष बीड- सुवर्णाताई गिर्हे
१६) बीड तालुकाध्यक्ष- कुशावर्ताताई हावळे
वरील सर्वांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आशाताई मोरजकर यांनी राबवलेल्या ‘नवरात्र महोत्सव- जागर स्त्री शिक्षणाचा’ या विशेष उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते व्याख्यात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. परभणी येथे होणाऱ्या मराठा सेवा संघ राज्यस्तरीय महाधिवेशन २०२२ च्या नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात महिला पुजारी नेमण्या संदर्भातील मागणीवर विचार विनिमय करण्यात आला. जिजाऊ जयंती १२ जानेवारी २०२३ संदर्भात नियोजन आराखडा तयार करण्यासंबंधी प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात चर्चा झाली.
या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे, तालुकाध्यक्ष शिवश्री संतोष माने, कार्याध्यक्ष शिवश्री ज.रा. शिंदे (बप्पा) यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमासाठी मराठवाडा विभागातील हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी पवार व नीता बावणे यांनी केले.