वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बुधवारी दि. 23 जून रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील 44 प्राथमिक आरोग्य केंद्र, उस्मानाबाद येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 6 ग्रामीण रुग्णालय, 4 उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद असे एकूण 58 ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आणि ऑनस्पॉट नोंदणी या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. दि. 22 जून सायंकाळी 5 पासून ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी स्लॉट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन व ऑनस्पॉट यासाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या नागरिकांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यात खालील ठिकाणी लसीकरण होणार आहे.
लोहारा, सास्तुर, कानेगाव, माकणी, जेवळी, आष्टाकासार
No Result
View All Result
error: Content is protected !!