वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड १९ महामारीच्या काळात कार्य केलेल्या डॉक्टर्स, नर्स, मुख्याध्यापक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल (दादा) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत अंतर्गत कोविड १९ महामारीच्या काळात गावातील नागरिक प्रादुर्भावामुळे अस्वस्थ झाले होते. अशा परिस्थितीत स्पर्श रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या सर्व आशा कार्यकर्ती यांनी गावातील नागरिकांना मानसिक धैर्य देऊन मनोबल वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा रुग्णांना तात्काळ उपलब्ध केल्या. गृहभेटी, रॅलीद्वारे कोविड १९ ची जनजागृतीचे उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने सास्तुर येथील १८ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसचे लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने १०० टक्के यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्याबद्दल सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्पर्श रुग्णालयामधील सर्व डॉक्टर्स सर्व स्टाफ, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस तसेच सर्व आशाताई यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्याबरोबरच स्पर्श ग्रामीण रुग्णालयचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या शितल राहुल पाटील होत्या. यावेळी सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, डॉ. मनिषकुमार प्रसाद, डॉ. वैभव माडजे, डॉ. रहीम पटेल, ग्रामविकास अधिकारी डि. आय. गोरे, आशा सुपरवायजर संगीता क्षीरसागर, सर्व ग्रा.पं सदस्य छायाताई पवार, बारकाबाई गायकवाड, कविता चिवरे, श्रीधर माने, राहुल औसेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.