वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माजी न्यायाधीश कै. गुलाबराव हुलसुरे यांचे दुःखद निधन झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी सोमवारी (दि.१९) जेवळी येथे हुलसुरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जि.प. सदस्या शोभाताई तोरकडे, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप भालेराव, पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, दक्षिण जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे, सेवा दल अध्यक्ष राजु तोरकडे, अशोक भुसने, मल्लिनाथ वलदोडे, प्रभूराज पनुरे, चनबस जेवळीकर, दत्ता गाडेकर, ब्रह्मानंद पाटील, प्रमोद आबा कुलकर्णी, मल्लिनाथ हुलसुरे, राजीव हुलसुरे, कांत हुलसुरे आदी उपस्थित होते.