वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून केलेल्या हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सोमवारी ( दि. ११) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला लोहारा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीनही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लोहारा शहरात सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांना आपापली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याची विनंती करत शहरातून फिरत होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यानंतर लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिमान खराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जालिंदर कोकणे आदींनी आपली मनोगत व्यक्त करून शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. व केंद्र सरकार व भाजपा प्रणित सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच लखीमपूर खिरी येथील मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोहारा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लोहारा तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. पेशकार बालाजी चामे यांनी हे निवेदन स्वीकारले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. पाटील, माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, महेबूब गवंडी, श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, अमीन सुंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोविंदराव साळुंके, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, प्रकाश भगत, माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, ओम पाटील, संतोष फावडे, नामदेव लोभे, प्रकाश होंडराव, सचिन रणखांब, नितीन जाधव, शिवा सुतार, इंद्रजित लोमटे, नितीन पाटील, ऍड. दादासाहेब जानकर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, इस्माईल मुल्ला, महेश कुंभार, जावेद मोमीन, आदींसह महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.