वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात सध्या १०२.३०० दलघमी पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्प माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे.मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे तेरणा धरणातून विसर्ग झालेले पाणी माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात येत आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ७ पर्यंत माकणी येथील प्रकल्पात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्प माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे उपविभाग क्र ३ लातूरचे उपविभागीय अधिकारी यांनी लोहारा तहसीलदार यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.