वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पातील पाण्याचे पूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते बुधवारी (दि.७) करण्यात आले.
तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प यावर्षीही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. बुधवारी (दि.७) या प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व हभप महेश महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील पाणीसाठ्याचे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याबाबत तसेच लगतच्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत योग्य प्रकारे नियोजन करण्याबाबत लाभक्षेत्र प्राधिकरण कार्यालयाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता नितिन पाटील यांना सुचित केले. तसेच येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या वेळी धरणालगतच्या गावांना धोका होणार नाही याची गांभिर्याने दखल घेण्याबाबत खा. ओमराजे निंबाळकर यांनी निर्देश दिले. तसेच राजेगाव येथील राजेगाव बंधाऱ्याची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बंधाऱ्यावरील रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत संबंधीतांना यावेळी निर्देश दिले.
यावेळी माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, सोसायटीचे चेअरमन बालाजी साठे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, शहाजी आळंगे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, करजगावचे माजी सरपंच शरद जाधव, उपसरपंच नागनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन आलमले, बाळू कांबळे , अच्युत चिकुंद्रे, सरदार मुजावर, प्रताप राजपूत, पांडुरंग बिराजदार ,रमेश इंगळे, तहसीलदार संतोष रुईकर, मंडळ अधिकारी शहाजी साळुंके, तलाठी वाजिद मणियार, ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, शाखा अभियंता के आर एनगे, फतरू सय्यद, भा़लचंद्र जाधव, अंतू गुबाळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.