वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
साने गुरुजी विद्यालय येस्तार (ता. अहमदपूर, जिल्हा लातूर) या विद्यालयातील मुख्याध्यापक बसवराज बाळुरे हे २७ वर्षे सेवा देऊन सेवामुक्त झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक शंकरराव कदम होते. यावेळी प्रा. डॉ. नारायण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, येस्तार गावाचे सरपंच महेश ढाकणे यांच्या हस्ते बसवराज बाळूरे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बसवराज बाळूरे हे या विद्यालयात येण्यापूर्वी रमामाता आंबेडकर अध्यापिका विद्यालय औराद शहाजनी येथे प्राचार्य पदावर ७ वर्ष सेवा दिली होती. त्यांच्या कार्य काळात जवळपास ३०० शिक्षिका घडल्या. ते गणित या विषयाचे अध्यापन करायचे. यामुळे साने गुरुजी विद्यालय या शाळेचा निकाल ५ ते ६ वर्षे सतत १००% लागला होता. ते एक विद्यार्थी प्रिय व पालकांचे आवडते शिक्षक होते. त्यांनी आपल्या या कार्यकाळात विविध उपक्रम राबविले. त्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमासाठी परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, माजी विद्यार्थी, अहमदपूर गणित मंडळाचे गणित मित्र, येस्तार, टाकळगाव, शेनकुड, वंजारवाडी या गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून बाळुरे यांचा सत्कार केला व पुढील भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी बसवराज बाळूरे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी, संस्था सचिव डी. बी. लोहारे व गावकरी यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वाडीकर वनिता यांनी केले व आभार प्रदर्शन दत्ता तुकाराम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मठपती विवेकानंद, जाधव सुनील, बिरादार सर , किडे सर, पांडे सर, सूर्यवंशी सर यांनी परिश्रम घेतले.
No Result
View All Result
error: Content is protected !!