वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून बुधवारी (दि.३१) सकाळी दहाच्या सुमारास या प्रकल्पाच्या चार दरवाजे ०.१० मीटर ने उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे . त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती
निम्न तेरणा प्रकल्प माकणी
दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ वेळ ०६:०० वाजता
एकूण साठा – ११९.७८६ दलघमी
*उपयुक्त साठा – ८९.८१९ दलघमी
पाणी पातळी ६०४.३५ मी
उपयुक्त साठा टक्केवारी ९८.४६%
प्रकल्पीय
एकूण साठा १२१.१८८ दलघमी
उपयुक्त साठा ९१.२२१ दलघमी
मृत साठा. २९.९६७ दलघमी
पूर्ण संचय पातळी ६०४.४० मी
-के.आर.येणगे (शाखा अभियंता)
विसर्ग अलर्ट
विसर्ग :-
आज ठिक 10.00 ते 10:30 वा. दरम्यान निम्न तेरणा प्रकल्पाचे द्वार क्र. 1, 14, 6 व 9 असे एकुण 4 द्वारे 0.10 मीटर उंचीने उघडून तेरणा नदीपात्रात 43.328 घमी/सेकंद ने (1530.11 घनफूट/सेकंद) विसर्ग सुरू करण्यात येईल. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.