लोहारा / सुमित झिंगाडे
उस्मानाबाद तालुक्यातील सिद्धेश्वर वडगाव येथील मंगल कार्यालयात वारकरी साहित्य परिषदेचा ११ वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अनिल खोचरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक जनमतचे लोहारा तालुका प्रतिनिधी यशवंत भुसारे ( पत्रकार) ह.भ.प. रामकृष्ण महाराज तोरंबेकर, परमार्थ भुरटे, बाल हर्षद घुगे यांना वारकरी साहित्य परिषदेच्या ११ वा वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वारकरी साहित्य संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्रीहरी चौरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गरड, महिला अध्यक्ष सिंधुताई बडुरे, लोहारा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार, सचिव सचिन दासीमे, महिला उपाध्यक्ष सरस्वती यादव तर लोहारा तालुक्यातील संत मिरा भजनी मंडळ सालेगाव, संत कान्होपात्रा भजनी मंडळ तावशीगड, महिला भजनी मंडळ दतनगर, हनुमान भजनी मंडळ सय्यद हिप्परगा या पाच गावांतील भजनी मंडळांना मृदंग, वीणा व पाच जोड टाळ देऊन नामाचा जयघोष करीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.