Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विधि सेवा प्राधिकरण सर्व नागरिकांना सेवा देण्यास कटीबध्द – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.शेंडे – शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांचा महामेळावा

admin by admin
14/11/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
शासनाच्या विविध सेवा या घटनेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या योजना आहेत. सर्वांना समान, निरंतर आणि समान संधी या तरतुदीप्रमाणे सेवेचा अंतर्भाव केला आहे. शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत कशा पध्दतीने पोचवता येणे शक्य आहे त्याची जबाबदारी शासकीय विभाग पार पाडत असतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आणि शासनाच्या मदतीने स्थापन झालेल्या विधि सेवा प्राधिकरण गरजु आणि होतकरु नागरिकांना सेवा देण्यास कटीबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस.शेंडे यांनी आज येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे न.प.सभागृह येथे आयोजित योजनांच्या महामेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस.आर.मुंढे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य मिलिंद पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव आदी उपस्थिते होते.


या विधी सेवा देत असताना विधी म्हणजे कायदा प्रत्येक नागरिकांशी निगडित असून त्याचे जीवनमान आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व बाबींवर त्याचा परिणाम किंवा उपयोग होत असतो. वृध्द, लहान, विधवा, निराधार, दिव्यांग किंवा बेरोजगार या सर्वांना योजनांची माहिती मिळावी म्हणून या शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही न्यायाधीश श्रीमती शेंडे म्हणाल्या.
या ठिकाणी सर्व शासकीय विभागामार्फत विविध शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच या स्टॉलच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांनाही लाभाचे या ठिकाणी वितरण करण्यात आले. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात काही ठिकाणी शिक्षणाचा आणि निधीचा अभाव असतो. अशा प्रत्येक ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही माहिती पोहोचविणे शक्य होत नसल्यामुळे या मेळाव्याचे आयोजन करण्यामागचा उद्देश आहे.
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रकाशीत करण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती असलेल्या “योजना शासनाच्या जनतेच्या विकासाच्या” या पुस्तिकेचेही यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती शेंडे, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. या पुस्तकामध्ये शासनाच्या विविध विभागातील योजनांची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती जर शेतकऱ्यांना असेल तर एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता इतर आपल्याला काय करता येईल याचा सुध्दा विचार शेतकऱ्यांना करता येईल. मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला आपण योजनांपर्यंत येण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, तर योजना त्यांच्या दारापर्यंत न्याव्या लागतात. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही यावेळी श्रीमती शेंडे म्हणाल्या.


यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे या शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तसेच लाभार्थ्यांचेही अभिनंदन केले, सर्वांनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.ओम्बासे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले तर सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस.डी. कामत यांनी केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘हिंसामुक्त ‘जीवन, आनंदी जीवन’ अभियान – लोहारा येथे रविवारी कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

यशवंत भुसारे यांना विठ्ठल पुरस्कार प्रदान

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

यशवंत भुसारे यांना विठ्ठल पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's