वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग संघटना लोहारा यांच्या तर्फे लोहारा येथील कोविड केअर सेंटर येथे फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा येथील कोविड केअर सेंटर येथे प्रहार अपंग संघटना लोहारा यांच्या तर्फे फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रहार संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष मोहम्मद आत्तार, उपाध्यक्ष अभिजीत साळुंके, शहरप्रमुख अंजली भोकरे, कोषाध्यक्ष संतोष गव्हाळे यांच्यासह किसन पवार, श्रीमंत गरड, बाजीराव पाटील, सचिन साळुंखे, वैशाली धारुळे, आदम शेख, बालाजी सूर्यवंशी, शुभांगी सितापुरे आदी उपस्थित होते.