Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कु. सक्षणा सलगर यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्यास कडक शिक्षा द्यावी – उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी – जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांना दिले निवेदन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. ५) जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांना काही गावगुंडांनी शनिवारी दिनांक 3 जुलै रोजी संध्याकाळी 06 वाजून 14 मिनिटांनी फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी दिलेली आहे. सदरील व्यक्तींनी गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहोत असाही उल्लेख केला आहे. एका महिला, मुलींना अपमानास्पद व लज्जास्पद भाषेत बोलणे हा गुन्हा असून सदर व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करून एक चांगला सामाजिक पायंडा घालावा. कु. सक्षणा सलगर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा असल्याने त्या महाराष्ट्रभर दौरा करत असून संदर्भीय धमकीच्या अनुषंगाने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कु. सक्षणा सलगर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या घेतलेल्या समाचाराच्या पार्श्वभूमीवर एका माथेफिरु तरुणाने कु. सलगर यांना कॉल करून अर्वाच्य भाषा वापरत \”मी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असून तु त्यांच्यावर परत टीका करू नको, नाहीतर तुला जिवंत गाडीन\” अशी धमकी दिली. \"\"सदर युवकाने वापरलेली भाषा ही लांच्छनास्पद असून महिला किंवा तरुणीवर असे वक्तव्य करणारी ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारी आहे. तरी सदर माथेफिरू तरुणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद विधानसाभा अध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष वाजिद पठाण, शहराध्यक्ष आयाज शेख, तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे, नगरसेवक गणेश खोचरे, महेश नलावडे, प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रशांत कवडे, वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, अमोल पाटील, रणजीत दांगट, धीरज घुटे, अभिजित जगताप आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Previous Post

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग संघटना लोहारा यांच्या तर्फे फळे वाटप

Next Post

दिलासादायक बातमी – लोहारा तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर – तालुक्यात फक्त 40 ऍक्टिव्ह रुग्ण

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

दिलासादायक बातमी - लोहारा तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर - तालुक्यात फक्त 40 ऍक्टिव्ह रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!