वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कळंब शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची वज्रमूठ कायम असून कळंब शहर व तालुक्यातील विकासात्मक कामासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले.
शनिवारी दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी कै. वसंतराव काळे संगणक महाविद्यालयातील सभागृहात कळंब शहराच्या येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार राहूल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, धनेश्वरी शिक्षण समुहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे, जेष्ठ नेते भास्कर खोसे, युवकचे प्रदेश सरचिटणीस तारेक मिर्झा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा. तुषार वाघमारे, युवक कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुनंदा भोसले, भास्कर खोसे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, सागर मुंडे, गटनेते लक्ष्मण कापसे, शिक्षक सेल तालुकाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळामध्ये कळंब शहरात मोठ्या प्रमाणात विकासकार्य झालेले असून खा. शरदचंद्र पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुरोगामी विचार आणि तळागाळातील सर्वसामान्यांसाठी विकासात्मक भूमिका मांडूनच येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आजच्या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वज्रमूठ कायम असल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी आमदार राहुल मोटे यांनी कळंब तालुक्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्वामार्फत सर्वोत्तपरी सहकार्य मिळवून देणार असून आपण सुद्धा सर्वानी मिळून पक्षाला जनाधार मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन केले.
या बैठकीत प्रा. श्रीधर भावर यांनी संघटनात्मक बाबींचा आढावा घेत येणाऱ्या काळात सुद्धा सर्वाना सोबत घेऊन पक्ष व विचारधारा केंद्रस्थानी ठेऊनच काम करणार असल्याचे सांगितले. तसेच उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी पक्षाने नगर पालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेल्या विकासकार्याचा लेखाजोखा मांडला.
यावेळी नगरसेवक अमर गायकवाड, नगरसेवक सुभाष पवार, शकील काझी, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के, उपाध्यक्ष भाऊ कुचेकर, सुमित रणदिवे, बापू सावंत, अल्पसंख्यांक महिला तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, शहराध्यक्ष सय्यद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमा हगारे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा सचिव दर्शना बचुटे, अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्ष अतिक पठाण, शहराध्यक्ष सर्फराज मोमीन, शहर कार्याध्यक्ष महेश पुरी, उपाध्यक्ष उत्तरेश्वर चोंदे, कार्याध्यक्ष दिनेश यादव, अशोक जगताप, आफताब तांबोळी, विठ्ठल कोकाटे,अल्ताफ बागवान,सौरभ मुंडे,आकाश धनावडे,हुजेब बागवान आदींची उपस्थिती होती. या बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी केले तर आभार शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब कथले यांनी मानले.