Wednesday, October 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

by मुख्य संपादक
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0

१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी (दि.१) जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध घोषणा देण्यात आल्या.
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग धाराशिव, जिल्हा रुग्णालय धाराशिव, स्पर्श उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सास्तूर गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाचे प्रकल्पाधिकारी आर.बी. जोशी, वैद्यकीय अधिकारी ए.आर.टी.विभागाचे डॉ. सत्यम गुरुडे, स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. भक्तराज ठोंबरे, डॉ. गणेश मरलापल्ले, डॉ. अरबाज पटेल, अच्युत आदटराव तसेच सास्तुर येथील श्री शान्तेश्वर विद्यालयातील प्राध्यापक जाधव सर, प्राध्यापक पाटील सर, क्षयरोग विभागाचे ज्ञानेश्वर बिराजदार यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. सास्तुर येथील स्पर्श उपजिल्हा रुग्णाल्यातील सर्व कर्मचारी, शांतेश्वर विद्यालयातील विद्यार्थी, सास्तूर गावातील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत \”आधी तपासणी रक्ताची, मग सुपारी लग्नाची”, “एड्सची मैना करी जीवाची दैना”, “नारी शक्ती करे पुकार एचआयव्ही एड्स हद्दपार” आदी घोषणा देण्यात आल्या.

\"\"


प्रास्ताविकपर भाषणात स्पर्श जिल्हा रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता कशी करावी, रोगराई पासून आपला तसेच आपल्या कुटुंबीयांचा बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक व्यक्तींनी आपली बिपी, शुगर, कॅन्सर इत्यादींची तपासणी वेळोवेळी सरकारी दवाखान्यात करून घ्यावी. एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी असलेल्या सुविधा त्यांना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन रमाकांत जोशी यांनी केले. महाराष्ट्रात प्रत्येक सरकारी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दवाखान्यात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी लोकांनी/ लाभार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती, शंका न बाळगता स्वतःची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी असे आवाहन स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीटीसी समुपदेशक दीपा पवार यांनी केले. तसेच मुलांच्या लग्नाच्या अगोदर प्रत्येकाने स्वतःची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी ह्याबाबत मार्गदर्शन केले. दिपा पवार यांनी एचआयव्ही एड्स बाबतच्या काही हेल्पलाइन नंबर आहेत. त्याविषयी माहिती दिली. एचआयव्ही विषयी लोकांच्या मनात किती गैरसमज आहेत ते कमी करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येत आहे. याबाबतही माहिती दिली.
त्यानंतर स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाच्या एआरटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यम गुरुडे यांनी एआरटी विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये औषध उपचार घेण्यामुळे एचआयव्ही संसर्गित व्यक्ती सर्वसामान्यप्रमाणे चांगल्या प्रकारे जीवन जगू शकते यावर ही मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील क्षयरोग विभागाचे ज्ञानेश्वर बिराजदार यांनी टीबी मुक्त भारत होण्यासाठी क्षयरोगाची तपासणी करून घ्यावी तसेच क्षयरोगाची लक्षणे कोणती याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा पवार यांनी केले.

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: जागतिक एड्स दिनसास्तुरस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

माकणी येथे राज्यस्तरीय जवाहर नवोदय सराव परीक्षेची जय्यत तयारी; ११२८ विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

Next Post

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात - शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!