Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लातूर बसस्थानक ते शाहू महाविद्यालय रस्ता चार चाकीसाठी 1 जानेवारी पासून बंद

by admin
in मराठवाडा
A A
0

लातूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी 1 जानेवारी पासून प्रायोगिक तत्वावर बसस्थानक ते शाहू कॉलेज रस्ता चार चाकीसाठी त्या बाजूने बंद करण्यात येईल. शहरातील प्रत्येक चौकातील अतिक्रमण काढण्यात येणार असून रिक्षा थांबे, बाहेर गावी जाणाऱ्या खासगी जीप्स, बस वाहतूक यांच्यासाठी जागा निश्चित करून देण्याची कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
बुधवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एस. टी. प्रशासनाने शहरातील बसस्थानकातील पार्सल कार्यालयाची जागा बदलता येईल का हे पहावे. दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून प्रायोगिक तत्वार राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर या रस्ता या मार्गे चारचाकी वाहनासाठी बंद असेल तिथे येणाऱ्यासाठी गुळ मार्केटकडून प्रवेश सुरु असेल. उद्यापासून म्हणजे दि. 22 डिसेंबर, 2022 पासून गंजगोलाईतील फेरीवाले, भाजी विकेत्यांनी रेलिंगच्या आतच बसण्याची कार्यवाही करण्यात येईल. गंजगोलाई येथील स्वच्छतागृहाच्या शेजारी ॲटोरिक्षा थांबा करण्यात यावा. शहरातील प्रत्येक चौकात झालेले अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याची कारवाई प्रशासनाने करावी. साई नाका चौकातील पीव्हीआरकडे जाणाऱ्या रिंगरोडच्या सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरमुळे अडथळा निर्माण होत आहे, तो 12 फुटापर्यंतचा काढण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
बसवेश्वर चौकातून मार्केट यार्डला येणाऱ्या रस्त्यावर फक्त मार्केटला येणाऱ्या मालवाहतूकीला परवानगी देण्यात येईल. इतर वाहनांना बंदी घालण्यात यावी. शहरातील नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही दुरुस्तीचे कामे तात्काळ पूर्ण करावेत.

दोन ठिकाणी नवीन सिग्नल
अहिल्याबाई होळकर चौक , पीव्हीआर चौक या दोन ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्याचे नियोजन करण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.

ट्रॅव्हल्स बस रात्री 8 पासून 9 पर्यंतच शहरात परवानगी

रात्री 8-00 ते सकाळी 9-00 वाजेपर्यंतच ट्रॅव्हल्स बस शहरात येतील. रात्री 8 पूर्वी आणि सकाळी 9 नंतर शहरात प्रवेश बंद असेल, याबाबत ट्रॅव्हल्स चालकांनी व मालकांनी काळजी घ्यावी.

ट्रक टर्मिनलसाठी जागा
एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनलसाठी महानगरपालिकेची जागा राखीव आहे. त्या जागेची तात्काळ पाहणी करून ट्रक टर्मिनल करण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

Ad 2
Ad 1
Tags: लातूर
Previous Post

लोहारा तालुक्यातील १३ पैकी ९ ठिकाणी महिला सरपंच – निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी केला जल्लोष

Next Post

उमरगा शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी १० कोटी रु. निधी मंजुर – आ. ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

उमरगा शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी १० कोटी रु. निधी मंजुर - आ. ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!