वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) च्या उपसरपंचपदी अखिल बडेसाब तांबोळी यांची निवड झाली. या निवडीनंतर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
तालुक्यातील कास्ती (बु) चे सरपंच पद अनुसूचित जमाती करिता राखीव आहे. परंतु एकूण ९ सदस्यांपैकी ८ जागेची निवडणूक झाली. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गाची जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. भुजंगराव आर्यभानु परसे, सुधीर महादेव साबळे, विशाल शंकर चव्हाण, वृन्दावनी महादेव भंडारे, गायत्री कृष्णात पाटील, सुवर्णा संजय कुंभार, संगीता सदाशिव वाळके आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंच पदासाठी अखिल बडेसाब तांबोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष अशोक जवळगे, लोहारा न.पं चे नगरसेवक अभिमान खराडे, माजी जि.प. सदस्य श्रीरंग पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, ईनुस पटेल, नसिम हुंडेकर, पॅनल प्रमुख परवेज बडेसाब तांबोळी, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर परसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागेश चव्हाण, गोविंद चव्हाण, मुकुंद परसे, काकासाहेब चव्हाण, भानुदास भंडारे, महादेव भंडारे, बीभीषन चव्हाण, बालाजी काळे, नेहरू चव्हाण, कल्याण कांबळे, पिरपाशा मुल्ला, नागोराव परसे, कस्तुरबाई चव्हाण, बळीराम गुरव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.