वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील लोकसंख्या १८१० असून यापैकी १८ वर्षांवरील ११६३ पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. मंगळवारी (दि.२) रात्री १० वाजता मोबाइल टीमद्वारे शेवटच्या पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात आली.मोबाईल टीम मधील सदस्य डॉ. गणेश धज, आरोग्यसेवक शंकर जवादे, आरोग्य सेविका प्रभावती बिराजदार, आशा स्वयंसेविका मिना लद्दे यांनी घरोघरी जाऊन लाभार्थींचे लसीकरण पूर्ण केले. मोबाईल टीम सोबत नागरिकांना लसीकरण करून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरपंच सागर पाटील, उपसरपंच इंद्रजीत लोभे, ग्रामसेवक बी. एस. जट्टे तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती बारगळ, श्रीमती साळुंके, श्रीमती गुंड, श्रीमती भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे ग्रामपंचायत मध्ये प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्व विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केले तर १००% लसीकरण करणे अवघड नाही. डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी