वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा, प्रथम एज्युकेशन फौंडेशन व श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील जेवळी तांडा ( पूर्व) येथे सोमवारी (दि.१९) स्वयंम रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम एज्युकेशन फौंडेशन किल्लारीचे केंद्रप्रमुख सदाशिव साबळे हे होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रभुराज पनुरे, शिवनगर तांड्याचे नायक रामा नाईक जाधव, गोर सेना अध्यक्ष मधुकर जाधव, संजय जाधव, प्रकाश भगत, सचिन रणखांब, गोपाळ माने, प्रा. चंद्रकांत जाधव, मोहन पवार, पिंटू चव्हाण, संजय जाधव, सुमित राठोड, प्रदीप राठोड, शाम राठोड, सोमनाथ राठोड, सुमित कोतीमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्किल डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही. केंद्र सरकार खाजगीकरणावर जोर देत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून खाजगी नोकरीकडे वळले पाहिजे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रभुराज पनुरे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदाशिव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती-जमातीचे सेलचे तालुकाध्यक्ष रविराज राठोड यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यात सहभागी तरुणांना मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील करजगाव येथील विकास भास्कर मुसांडे यांची तलाठी म्हणून निवड झाल्याबद्दल सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.