वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील बौद्ध विहार येथे भीमक्रांती महिला मंडळाच्या वतीने सोमवारी (दि.१६) बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भातागळीचे उपसरपंच हणमंत कारभारी यांच्या हस्ते तथागत गौत्तम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजारोहन करून सामूहिक पंचशील घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच दैवशाला भंडारे, पोलीस पाटील मनीषा पाटील, ग्रा.पं.सदस्य तथा राष्ट्रवादी सा.न्याय.विभाग तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, हणमंत मस्के, भीमक्रांती महिला मंडळ अध्यक्षा शोभा मस्के, सचिव त्रिशाला गायकवाड, उपाध्यक्षा अनुसया मस्के, महिला मंडळाच्या सदस्या यांच्यासह बालाजी गायकवाड, महादेव गायकवाड, करण गायकवाड, प्रल्हाद मस्के, पंडित मस्के, शेषेराव गायकवाड, प्रकाश गायकवाड, गौत्तम गायकवाड, नाना खंडाळे आदी उपस्थित होते.