वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील मार्डी येथे जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्था कानेगाव यांच्यामार्फत भारतीय खाद्य निगम किमान आधारभूत खरेदी केंद्राचा शुभारंभ बुधवारी (दि.९) करण्यात आला.
शासनाचा हरभरा खरेदीसाठी हमीभाव ५२५०/- आहे. या केंद्रावर सदरील हमीभावाने हरभरा खरेदी होणार आहे. या केंद्राचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एफसीआय विभागीय व्यवस्थापक राजेश जनबंधु साहेब, सरव्यवस्थापक गोकुळ राठोड, रविंद्र वाले, सहाय्यक गुणनियंत्रक मंजुनाथ कस्तुरे, महेश जाधव, जिल्हा पणन अधिकारी विलास सोमारे, मोहन सुरवसे लोहारा तहसील कार्यालयातील एम. जी. जाधव, योगेश देवकर, उमराव देवकर, व्यंकटराव साळुंके, संतराम पाटील, शिवाजी कोकरे, भगवान पाटील आदीसह शेतकरी उपस्थित होते. हरभरा खरेदी सहजरित्या होईल. फक्त शेतकरी बांधवांनी ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक देऊन ऑनलाइन करून घ्यावे व हरभरा मोजणीसाठी तात्काळ आणावा असे आवाहन भगवान पाटील यांनी केले आहे.