वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे सोमवारी (दि.१५) कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी मासिकाचे वाचन करण्यात आले. या शेती शाळेत कृषी सहाय्यक बाळासाहेब बिराजदार यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग, गांडूळ, नॅडेप आदी योजनांमधे शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. तसेच शेतकरी मासिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी उपसरपंच सुरेश देशमुख, प्रगतशील शेतकरी सचिन देशमुख, गहिनीनाथ सुरवसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.