Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत संपन्न – काही इच्छुक आनंदी तर काहिजणांचा हिरमोड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडती करिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घेण्यात यावा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याप्रमाणे सोमवारी (दि. १५) लोहारा तहसील कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अधिसूचनेनुसार १ फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. दि. ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता दिली. व दि. ८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.
परंतु एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडती करिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घेण्यात यावा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ नोव्हेंबर रोजी काढला. त्यामुळे लोहारा नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्याकरिता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोमवारी (दि.१५) प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत लोहारा तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण १७ प्रभागापैकी प्रभाग क्रमांक ११ व १२ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यात प्रभाग ११ महिलांसाठी राखीव झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक ८, १०, १६, १७ आरक्षित झाले आहेत. त्यापैकी प्रभाग ८ व १७ महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ११ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ७, १५ सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक १, २, ६, ९, १३, १४ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते. या सुधारित सोडतीत नामाप्रच्या पाच ऐवजी आता चार जागा झाल्या आहेत. परिणामी सर्वसाधारण प्रवर्गातील एक जागा वाढली आहे.\"\"यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शहरप्रमुख सलिम शेख, काँग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील, बाळासाहेब पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, दिपक मुळे, माणिक चिकटे, माजी नगरसेवक आयुब शेख, शाम नारायणकर, बाळासाहेब कोरे, दिपक रोडगे, श्रीकांत भरारे, श्रीकांत कांबळे, विजय ढगे, दत्ता स्वामी, मल्लिकार्जन पाटील, ओम कोरे, चाँद हेड्डे, गोपाळ सुतार, ओम पाटील, सुरेश वाघ, जे.के. बायस, गोपाळ संदीकर, विजय फावडे, संभाजी सुरवसे, मधुकर भरारे, सतिश माळी, तानाजी घोडके आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आरक्षण सोडतनिवडणूकलोहारा नगरपंचायत
Previous Post

लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न

Next Post

सास्तुर जि.प. मतदारसंघात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व जि.प.सदस्या शितल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

सास्तुर जि.प. मतदारसंघात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व जि.प.सदस्या शितल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!