वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांचा शाहिरी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या माता पित्याचा आदर्श माता पिता म्हणून स्नमानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांचा शाहिरी कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट शाहीर कांबळे यांनी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून उलगडला. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी सूर्यवंशी मोघा, धनंजय जाधव हिप्परगा (रवा), भगवान पाटिल लोहारा, बोकडे सर कानेगाव आदींचा त्यांच्या पाल्ल्यांची एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आदर्श माता पिता म्हणून स्नमानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिवकरवाडी येथील मारुती शिवकर यांची मुलगी मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्यामुळे तिचाही सत्कार करण्यात आला.यावेळी विजय लोमटे, इंद्रजीत लोमटे, सरपंच राम मोरे, पोलीस पाटील संजय नरगाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय नरगाळे, तानाजी नरगाळे, राजेंद्र पाटिल, सतिष मोरे, आमोल जाधव, मनोज गवळी, तुकाराम हाराळे, धनंजय नरगाळे, सोमा मुळे, सुनील जाधव, तानाजी मोरे, प्रभाकर मोरे, बालाजी जाधव आदींनी प्रयत्न केले.