वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवावी असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
पुढील काही दिवसांत लोहारा नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे. या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी व पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोहारा येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, गोविंदराव साळुंके, माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवक तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला नगरपंचायतच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, नगरपंचायतची यापूर्वीची झालेली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवली होती. त्याचप्रमाणे यावेळीही निवडणूक स्वबळावर लढवायची आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू करावी, आपल्या पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटूकणे, भातागळी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी संजय गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या बैठकीसाठी मिलिंद नागवंशी, माजी सरपंच नवाज सय्यद, शब्बीर गवंडी, हेमंत माळवदकर, विनोद लांडगे, नगरसेवक गगन माळवदकर, जालिंदर कोकणे, हाजी बाबा शेख, बहादूर मोमीन, मुक्तार चाऊस, प्रकाश भगत, भागवत वाघमारे, भास्कर माने, सुरेश वाघ, बालाजी मेनकुदळे, लक्ष्मण रसाळ, राजपाल वाघमारे, पृथ्वीराज जगताप, सुरज साळुंके, सरफराज इनामदार, राज चाऊस, समीर शेख, हमीद पठाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.