वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळाकडून मंगळवारी (दि. ६) रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
गणेशोत्सवा निमित्त श्री बसवेश्वर गणेश मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. ६) शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सहभागी मुलींनी रांगोळीतून रक्तदान करा, जल ही जीवन हे आदी विषयासंदर्भात रांगोळी काढली. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्त, ब्लड प्रेशर, शुगर सह अनेक तपासणी करण्यात आली. तसेच बूस्टर डोस देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इरफान शेख, डॉ. कोमल मगर, फार्मासिस्ट अल्लाबक्ष बागवान, खंडू शिंदे, आरोग्य अधिपरिचारिका अंजु साळुंके यांच्यासह दत्ता बोर्डे, योगेश गायकवाड यांनी तपासणी केली.
यावेळी अध्यक्ष वैजिनाथ माणिकशेट्टी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव रामेश्वर वैरागकर दयानंद स्वामी, वीरभद्र फावडे, सागर स्वामी, विजय स्वामी, गणेश स्वामी, अप्पू स्वामी, अमित बोराळे, विरेश स्वामी, ओंकार पाटील, सचिन स्वामी, सिद्राम स्वामी, प्रशांत थोरात, श्रीकांत माळी यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.