लोहारा प्रतिनिधी
लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने क्रिकेटच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. २५) शहरातील हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर संपन्न झाले.
लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत फक्त ४ – ४ षटकाचे सामने होणार आहेत. उदघाटन प्रसंगी दीपक मुळे, अमीन सुंबेकर, योगीराज सोळशे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, जालिंदर कोकणे, नगरसेवक आरिफ खानापुरे, गगन माळवदकर, श्रीकांत भरारे, माजी पं स सदस्य दिपक रोडगे, नेताजी शिंदे, स्वप्नील माटे, रियाज खडीवाले, अक्षय पवार, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, जसवंतसिंह बायस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी हिप्परगा (रवा) व जेवळी या संघात उदघाटन सामना झाला. हा सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये हिप्परगा (रवा) चा संघ विजयी झाला. यावेळी किंग कोब्रा मित्रमंडळाच्या वतीने लोहारा शहरातील जुन्या क्रिकेट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यातील विजेत्या संघांस १५ हजार व चषक, उपविजेता संघास ११ हजार व चषक, तर तिसऱ्या विजेता संघास ७ हजार व चषक यासह वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी ओम पाटील, सतीश ढगे, गोपाळ सुतार, सुवन डोकडे, सुनील शिंदे, स्वप्नील स्वामी, शंभू स्वामी, गिरीश जट्टे, ईश्वर बिराजदार, परमेश्वर मुळे, राजपाल वाघमारे, चेतन पवार, मनोज लोहार, ओंकार जट्टे, मैनुदिन मोमीन, गौस मोमीन, अनिल यल्लोरे, अक्षय पवार, महेश चपळे आदी युवक परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेत एकूण ४२ संघांनी सहभाग घेतला आहे.
क्रिकेट मधील २०- २० सामन्यांमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये क्रिकेट बद्दल वेगळीच उत्कंठा निर्माण झाली आहे. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत १० षटके तर कुठे ८ षटकांचे सामने होतात. परंतु ही स्पर्धा ४ – ४ षटकांची असल्यामुळे लोहारा शहर व परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दल अधिक उत्कंठा निर्माण झाली आहे. त्यामुळे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी होत आहे.