लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.७) लोहारा हायस्कूल येथे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली.
शहरातील हायस्कुल लोहारा येथे ओळख क्रांतिवीरांची हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन ऐतिहासिक लोहारा शहराचा इतिहास जाणून घेतला. यावेळी दोन हजार क्रांतीविरांच्या छायाचित्रे व इतिहास प्रदर्शनाला भेट देऊन क्रांतीविरांचा पराक्रम जानून घेतला. तसेच लोहारा शहरातील सर्वात जुने सार्वजनिक ग्रंथालय असलेले लोक वाचनालय या ग्रंथालयास भेट देऊन वृत्तपत्र, विविध मासिके, विविध विषयांवरची पुस्तके,
स्पर्धा परिक्षेची पुस्तके पाहिली व वाचन केले. यावेळी ग्रंथालय प्रमुख संजय जेवळीकर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व पटवून सांगितले व माहिती दिली. यावेळी तिगाडे गुरूजी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोहारा शहरातील निजामकालीन वेस, निजामकालीन कचेरी, प्राचीन वाडे त्यांचे बांधकाम, दोन मजली प्राचीन इमारती, चालुक्य काळातील महादेव मंदिर, त्यांचे नक्षीकाम, विविध देवदेवतांच्या मुर्ती व त्याचा इतिहास, इतिहास विषयाचे प्राध्यापक यशवंत चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. यावेळी प्रा. अभिजीत सपाटे, प्रा. मल्लीनाथ चव्हाण, प्रा. रत्नमाला पवार, परमेश्वर कांबळे, महेश खोत यांच्यासह अकरावी व बारावी कला शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.