लोहारा येथे शुक्रवारी (दि.४) आरोदास रूग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना विविध सेवा देणार असल्याचे कंपनीचे संस्थापक संचालक दयानंद पाटील यांनी सांगितले.
लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी आरोदास रूग्ण सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि.४) करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी कंपनीचे संस्थापक संचालक दयानंद पाटील, ईतर स्टाफ़ व रुग्ण उपस्थित होते. या केंद्राद्वारे घरपोच चालु मेडीसिन देणे, घरी येऊन बेसीक तपासणी करणे, गरजेनुसार पेशंटना शहरातील रुग्णालयाला घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय करणे अशा विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येणार असल्याचे दयानंद पाटील यांनी सांगितले.