वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे रविवारी (दि.४) शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. या सप्ताहात शिवपाठ, अभिषेक, श्री परामराहस्य पारायण, भजन, कीर्तन, शिवजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह शहरातील मान्यवरांच्या हस्ते पंचाचार्य पूजन, ध्वज पूजन, विना पूजन, टाळ पूजन, मृदंग पूजन, पेटी पूजन करण्यात आले. शिवनाम सप्ताह व्यासपीठ प्रमुख शि.भ.प. शिवलिंगप्पा केराप्पा संगशेट्टी, शि.भ.प. भागवत बेळे महाराज आहेत. माहेश्वर मंडळात पंचय्या स्वामी, संगन्ना स्वामी, रामेश्वर स्वामी, बबन स्वामी यांचा सहभाग आहे.
यावेळी प्रसिद्ध शिव कीर्तनकार शि.भ.प. महादेवी मठपती (ननंद), शि.भ.प. धनराज बुलबुले (सामनगाव), शि.भ.प. भाग्यश्री शेरे-पाटील (दवन हिप्परगा), शि.भ.प. लक्ष्मण विभुते (माळकुंजी), शि.भ.प. किर्तीताई हिरेमठ (लातूर), शि.भ.प. विश्वनाथ स्वामी (वडवळ), शि.भ.प. निलकंठ विभुते (माळकुंजी) तर शेवटचे कीर्तन शि. भ. प. कुमार सागर स्वामी (लोहारा ) यांचे होणार आहे. दि. १० डिसेंबरला या सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहानिमित्त अन्नदात्यांकडून महाप्रसाद व अल्पोपहार देण्यात येणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.