लोहारा शहरात बुधवारी ( दि. ३१) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहारा शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि.३१) जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये हे शिबीर होणार आहे. शिबिरात सहभागी रक्तदात्यांना जयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास भव्य मिरवणुक आयोजित करण्यात आली आहे.