वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह तालुक्यात बैलपोळा हा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
बैलांच्या वर्षभर केलेल्या श्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. लोहारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. २६) बैलपोळा हा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या निमित्त बैलांची सवाद्य मिरवणूक काढन्यात आली. यावेळी वरुणराजा नेही हजेरी लावली होती. शेतीतील कामे करून कडक झालेल्या बैलांच्या खांद्याला आराम मिळावा म्हणून लोणी व हळदीचे मिश्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.२५) बैलांची खांदेमळणी करण्यात आली.
बैलांना स्वच्छ धुवून आल्यानंतर त्यांना साज श्रृंगार करण्यात आला. बैलांच्या शिंगांणा रंगरंगोटी, नक्षीकाम केलेली झुल अंगावर पांगरूण घालून शुक्रवारी ( दि. २६) दुपारी पाचच्या सुमारास गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. गावातील मारुतीचे दर्शन घेवून घरी आणल्यानंतर त्यांना पुरण पोळीचे नैवैद्य दाखवन्यात आला.