लोहारा शहरात शुक्रवारी (दि.९) महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोहारा तहसिल कार्यालयाच्या वतीने तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.९) हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नवीन आधारकार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे / नाव वाढविणे, जीर्ण / खराब शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ / विधवा / दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना , नवीन वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती ( घरगुती), वीजबिल दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी करणे, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती यासह इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.