वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील करजगाव येथील जाधव ग्रुपच्या हार्वेस्टर मशिनकडून सन २०२१-२२ च्या ऊस गळीत हंगामात एकूण चोपन हजार पाचशे टन एवढी विक्रमी ऊस तोड केली. मशिन मालकाने हंगाम संपवून मशिन गावी परत आल्यावर शुक्रवारी (दि.१०) डाॕल्बी लावून फटाक्याची अतिषबाजी करत मशीनची जंगी मिरवणूक काढली.
तालुक्यातील करजगाव येथील पंडित जाधव व साहेबराव जाधव यांच्याकडे ऊस तोडणीच्या दोन हार्वेस्टर मशिन आहेत. गेल्या पाच वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. सलग दोन वर्ष झालेल्या समाधानकारक पावसाने सर्वत्र ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे या वर्षी ऊस तोडणीचा व्यावसायही चांगला झाला आहे. त्यातच करजगाव येथील जाधव बंधुनी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करुन मशिन ग्रुपच्या माध्यमातून चोपन हजार पाचशे टन एवढी विक्रमी ऊसतोड केली. या ग्रुपकडून यावर्षी लोहारा येथिल लोकमंगल सहकारी कारखाना (विस हजार टन), समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना (चौदा हजार टन), भोसनूर(आळंद) एनएसएल सुगर (सात हजार टन), मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी कारखाना (चार हजार १०० टन), रांजणी येथील नॕचरल शुगरसाठी (तीन हजार ४०० टन) ऊस तोडून दिला. विस हजार टन ऊस तोडून पुरवठा केल्याबद्दल लोकमंगल कारखान्याकडून गळीत हंगामाच्या शेवटी या मशीन मालकाचा सत्कारही करण्यात आला असल्याची माहिती जाधव बंधूने दिली. यावेळी विक्रमी ऊस तोड झाल्याने गंळीत हांगाम संपवून मशिन गावाकडे येत असताना माकणी गावातून करगावपर्यंत दोन किलो मिटर अंतर डाॕल्बी लावून फटाक्याची अतिषबाजी करुन मशीनची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.