Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करावी – मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवी दिल्लीचे भाजपा मीडियाप्रमुख नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोहारा शहरातील मुस्‍लीम समाजाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे शुक्रवारी (दि.१०) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लोहारा तहसीलदारांमार्फत हे निवेदन देण्यात आले.
लोहारा शहर व तालुक्यातील तमाम मुस्लीम समाजाच्या वतीने दिलेल्या या निवेदनात म्हणले आहे की, भारतीय जनता पार्टीची नुपूर शर्मा हिने एका वृत्त वाहिनीवर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जाणीपूर्वक आक्षेपार्ह व अवमानकारक विधान करुन समस्त मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावणारे कृत्य केले आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जातीयवादी भारतीय जनता पार्टीकडून वारंवार केला जात असून देशात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी जाणीवपूर्वक करीत आहेत. त्यामुळे धर्माचा अवमान करणारे असे कृत्य मुस्लीम समाज कदापी सहन करणार नाही. देशात कानपूर व इतर भागात नुपूर हिच्या वक्तव्यामुळे हिंसक आंदोलने होत आहेत. तसेच भारत देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नाचक्की झालेली असून अनेक देशांनी नुपूर हिच्या हीन वक्तव्याची कठोर शब्दात निंदा करुन निषेध नोंदवला आहे. नुपूर शर्मा हिने जाती-जातीमध्ये द्वेष पसरविण्याच्या उद्देशानेच हे वक्तव्य केलेले असून तिच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक सलोखा, भाईचारा संपुष्टात येऊन दोन धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. देशात जातीधर्मावर टिकाटिप्पणी आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. त्यामुळे असे निंदाजनक वक्तव्य करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. राष्ट्राची एकात्मता कायम ठेवण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करुन देशात यापुढे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही धर्माविषयी अथवा महापुरुषांविषयी निंदाजनक वक्तव्य करण्याचे धाडस करु नये याकरिता कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\"\"प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लीम धर्माच्या भावना दुखावण्याचा तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी भारतीय जनता पार्टीची निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा आणि तिचे समर्थन करणारा भारतीय जनता पार्टीचा नवीन जिंदाल या दोघांना अटक करुन कठोर कारवाई करावी, तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लोहारा तहसील कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. यावेळी उपनगराध्‍यक्ष आयुब शेख, नगरसेवक आमीन सुंबेकर, निहाल मुजावर, सरफराज इनामदार, शम्‍पु पठाण, मोहिन चाऊस, इम्रान भोंगळे, आशपाक शेख, अजीम बागवान, सकलेन शेख, मोईन चाऊस, चांद शेख, रियाज जेवळे यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

Next Post

विक्रमी ऊस तोड करून गावी परत आल्यावर हार्वेस्टर मशीनची काढली मिरवणूक

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

विक्रमी ऊस तोड करून गावी परत आल्यावर हार्वेस्टर मशीनची काढली मिरवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!