प्रतिनिधी / उमरगा
आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा व उमरगा येथे गुरुवारी (दि.७) रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज सभागृहात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेनेचे लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उपतालुकाप्रमुख शिवराज चिनगुंडे, नामदेव लोभे, दत्ता मोरे, जगदीश लांडगे, सुधीर घोडके, नगरसेवक अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, किरण पाटील, विजय फावडे, प्रमोद बंगले, अविनाश राठोड, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक शाम नारायणकर, बाळासाहेब पाटील, श्रीशैल्य स्वामी, गोपाळ सुतार, अविनाश राठोड, भीमाशंकर डोकडे, अमिन मुलाणी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमरगा येथेही रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच शाळा परिसरातील झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड बसविणे, जिल्हा परिषद प्रश्नाला व जिजामाता विद्यामंदिर येथील शालेय विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोज वाटप, तसेच गरजू रुग्णांसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी युवा नेते किरणजी गायकवाड, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, सुधाकर पाटील, विलास भगत, सत्यम ज्ञानराज चौगुले, शरद पवार, योगेश तपसाळे, सचिन जाधव, गोपाळ जाधव, खयूम चाकूरे, लिंगराज स्वामी, प्रदीप मदने, विजयकुमार नागणे, विवेक हराळकर, डॉ.दामोदर पतंगे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, गटनेते संतोष सगर, संदीप चौगुले, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा शकुंतलाताई मोरे, शंकर सुरवसे, प्रवीण साठे, अमर शिंदे, योगेश शिंदे, महादू क्षीरसागर, युवराज मंडले आदी उपस्थित होते.