वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात सोमवारी (दि.१४) दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तालुका बैठक लोहारा उमरगा विधानसभेचे संपर्कप्रमुख अनंत पाताडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला लोहारा तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत पाताडे म्हणाले की, सर्वांनी एकजुटिने संघटन वाढवण्यासाठी काम करावे. लोहारा तालुक्यातील शाखा या कार्यान्वित करुन येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकित सक्रिय करण्यावर भर द्यावा. तसेच सामान्य नागरीकांच्या अडचणी सोडविण्यास सर्व पदाधिकारी यांनी पूर्वीपेक्षा जोमाने कार्य करावे असे सांगितले. काहीही अडचण असेल तर पक्ष आपल्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिल याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिली. यावेळी माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटिल यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन महेबुब गवंडी यांनी तर युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी आभार मानले.
या बैठकीसाठी माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे, उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटिल, शहरप्रमुख सलिम शेख, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, माजी पं.स. सभापती विलास भंडारे, सरपंच सचिन गोरे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, पंडित बारगळ, गणेश जाधव, अविनाश राठोड, पवन मोरे, पंडित ढोणे, रघुविर घोडके, बंकट माळी, महम्मद हिप्परगे, सुभाष बिराजदार, नितिन जाधव, आकाश जावळे, शुभम जावळे, अनिल मोरे, गोपाळ गोरे, पिंटु गोरे, चेतन गोरे, बालाजी जाधव, अमोल पाटिल, गोपाळ गोरे, गोपाळ मोरे, सिध्देश्वर गिराम, कुंडलीक सुर्यवंशी, अनिल गोरे, अहमद शेख, राजेंद पवार, राजेद्र लोभे, बाबासाहेब मोरे, शाम पाटिल, कमलाकर कदम, दिलिप कदम, सदाशिव हुलसुरे यांच्यासह लोहारा तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.