लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयासमोरील सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी (दि.१५) करण्यात आले.
तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून मंजूर असलेल्या माहेरघर (गरोदर माता व त्यांच्या नातेवाईकांना) राहण्याची सुविधा) बांधकाम करणे – ४२.८० लक्ष रु. या कामाचे भूमिपूजन व याच ठिकाणी अंतर्गत सिमेंट कॉंक्रिट रस्ता करणे – १९.९५ लक्ष रु. कामांचे लोकार्पण शनिवार दि.१५ रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शितलताई पाटील होत्या. या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास उदतपुरचे मा. सरपंच माधवराव पाटील, डॉ. सुजाता मुगळे, तुकाराम पवार, गोवर्धन मुसांडे, सुरेश दंडगुले, शाखा अभियंता अरुण रोडगे, फजल कादरी, माजी सरपंच विजय क्षीरसागर, बालेपीर शेख, एकोंडीचे सरपंच विकास पाटील, उदतपूरचे सरपंच बालाजी पवार, तुकाराम जाधव, धैर्यशील सूर्यवंशी, दिलीप बेन्डगे, लायकसाहब कादरी, गहिनीनाथ सुरवसे, आप्पासाहेब पवार, मोहन नारायणकर, युवासेनेचे प्रदीप मोरे, शेखर पाटील यांच्यासह सास्तूर व परिसरातील शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.