वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. १७) स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय, हिप्परगा (रवा) येथे ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा या संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन स्मृती वाचनालयाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर वाचनालयाचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला. या वाचनालयात साहित्यिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात याठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातुन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे महत्व याबाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले. हैदराबाद मुक्तिसंग्राम पुस्तकाचे लेखक कै. वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशिलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह श्रीधर गोपाल देशमुख सातप्पा होनाळकर, रूक्मीनबाई पंढरी मुळे आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी युवानेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकिले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, अविनाश माळी, श्रीकांत भरारे, सरपंच राम मोरे, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी. भोईटे, चेअरमन संतोष गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव जाधव, धर्मवीर जाधव, विजय पवार, रुक्मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे विजय वडदरे, प्रदीप मदने, बी.के. पवार, नामदेव लोभे, जगन पाटील, सलीम शेख, महेबूब गवंडी, जगदीश लांडगे, अभिमान खराडे, शाम नारायणकर, भरत सुतार, प्रेम लांडगे, शिवा सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.