बैलांच्या वर्षभर केलेल्या श्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. लोहारा तालुक्यात शुक्रवारी (दि. २६) बैलपोळा हा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बैलांच्या शिंगांणा रंगरंगोटी, नक्षीकाम करण्यात येते. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ५० खोके, एकदम ओके हे वाक्य खूप प्रसिध्द झाले आहे.
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील शेतकरी शिवराम आनंदगावकर यांनी त्यांच्या बैलांना रंगरंगोटी करताना त्या बैलावर ‘५० खोके, एकदम ओके’ असे लिहिले आहे. त्यामुळे हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिवसभर याच फोटोची चर्चा होत आहे.