बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (Hsc) कधी जाहीर होणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. अखेर मंगळवारी (दि.२१) दुपारी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा निकाल ९४.१९ टक्के लागला आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी व पालक निकाल पाहण्यासाठी उत्सुक होते. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. लोहारा तालुक्यातील ८०४ मुले व ५७४ मुली अशा एकूण १३७८ विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षा दिली होती. त्यापैकी १२९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९४.१९ टक्के लागला आहे. लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा यावर्षीही राखली आहे. या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी अंकिता जावळे ही ८८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर निखिल गोरे याने ८४.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा ९८.३८ टक्के तर कला शाखेचा निकाल ८७.६९ टक्के लागला आहे.
निकाल पुढीलप्रमाणे :-
विज्ञान शाखा –
श्रुती पाटील – ८५.६७ टक्के – प्रथम
प्रतीक माळवदकर – ८३.३३ टक्के – द्वितीय
ऋतुजा जगताप – ८१.६७ टक्के – तृतीय
वाणिज्य शाखा –
अंकिता जावळे – ८८ टक्के – प्रथम
निखिल गोरे – ८४.८३ टक्के – द्वितीय
क्रांती सूर्यवंशी – ७८.१७ टक्के
कला शाखा –
कीर्ती चव्हाण – ८०.३३ टक्के – प्रथम
फरहाना पठाण – ७८.६७ टक्के – द्वितीय
अंकिता सोनटक्के – ७७.३३ टक्के – तृतीय
प्राचार्या यु. व्ही. पाटील व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
———-
चौघांनी मिळवले १०० पैकी १०० गुण
या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या अंकिता जावळे, समीक्षा कदम, श्रद्धा रसाळ, प्रणिता भंडारे या चार विद्यार्थ्यांनी बुक किपिंग अँड अकाउंटंसी या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे व विषय शिक्षक विजयकुमार उंबरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.