पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट तर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. मनिषा अमोल बोराळे यांना मान्यवऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी तसेच पंचायत समिती अक्कलकोट शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अमोल तिपणे परिवार, कुनाळे परिवार, बोराळे परिवार व इतर सहकारी वर्ग यांच्या तर्फे सौ. मनिषा कुनाळे यांना सन २०२५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
