लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवारी (दि.३०) प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच नंदी ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वप्रथम लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात विधीवत पुजा करून ध्वज उभारण्यात आला. जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महात्मा बसवेश्वर चौक येथे प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, संगन्ना स्वामी, अभिमान खराडे, अमीन सुंबेकर, आयुब शेख, ओम कोरे, अविनाश माळी, के.डी. पाटील, बापू जट्टे, प्रशांत काळे, अमोल बिराजदार, दिपक मुळे, शाम नारायणकर, हरी लोखंडे, जगदीश लांडगे, ओम पाटील, संतोष फावडे, मल्लिनाथ फावडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव होंडराव, बाळु माशाळकर, प्रसाद मिटकरी, मल्लिनाथ घोंगडे, राजु जट्टे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, श्रीशैल्य मिटकरी, वीरभद्र फावडे, महेश कुंभार, सचिन तोडकरी, संदीप पाटील, समर्थ कुंभार, गणेश कामलापुरे, वैजिनाथ जट्टे, सोमनाथ जट्टे, शिवप्रसाद होंडराव, गणेश पालके, संगमेश्वर माशाळकर, कपिल माशाळकर, सुजित माशाळकर, किरण तोडकरी यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लोहारा शहरात शुक्रवारी (दि.२) भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.