Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

by मुख्य संपादक
in महाराष्ट्र
A A
0

शासनाने २५ गडकोटांच्या संवर्धनाची जबाबदारी द्यावी असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. \”जय भवानी, जय शिवाजी\”, \”तुमचं-आमचं नातं काय – जय जिजाऊ, जय शिवराय\” या गगनभेदी घोषणांनी गड दुमदुमला होता. या सोहळ्यावेळी समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, \”शिवराज्याभिषेक दिन\” हा आपल्या दृष्टीने देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे. शासनाने राज्यातील पंचवीस गडकोटांच्या संवर्धनाची जबाबदारी आम्हाला दिल्यास, शिवभक्तांच्या साथीने त्यांचे योग्य जतन, संरक्षण आणि संवर्धन कसे करावे, याचा आदर्श आम्ही घालून देऊ. रायगडाचा विकास हा माॅडेल म्हणून उभा राहत आहे.\”
यंदाच्या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले –

मेघडंबरीतील शिवपुतळ्याचे पूजन

सुवर्णमुद्रांनी अभिषेक

नगारखाना, बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिर मार्गावरून निघालेली राजदिंडी पालखी मिरवणूक

सदरेवर रंगलेले शाहीरांचे पोवाडे आणि गाथा

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना ध्वज प्रदान करण्यात आला. संपूर्ण रायगड परिसरात शिवभक्तांची अलोट गर्दी दिसून आली. गडाच्या पायऱ्यांचे नूतनीकरणाचे काम, पाणी व्यवस्थापन, तसेच अन्य मूलभूत सुविधांची कामे समितीच्या पुढाकाराने सुरू आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षणचित्रे –

\"\"
\"\"
\"\"
\"\"
\"\"
\"\"
\"\"
\"\"
\"\"
\"\"
Tags: रायगडशिवराज्याभिषेक सोहळासंभाजीराजे छत्रपती
Previous Post

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

Next Post

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

Next Post

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!