लोहारा तालुक्यातील एकुण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५- ३० साठीचे आरक्षण काढण्यात येणार आहे. दि. १० जुलै रोजी पंचायत समितीच्या मिटिंग हॉल मध्ये हे आरक्षण काढण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी दिली आहे.
तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतच्या सन २०२५ -३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. यापूर्वी दि.१६ एप्रिल रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. दि.१३जून रोजी काढलेल्या अधिसूचने नुसार रद्द करण्यात आली. त्यानंतर आता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोहारा तालुक्यातील एकुण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी दि.१० जुलै रोजी दुपारी चार वाजता पंचायत समिती मिटींग हॉल लोहारा येथे सोडत पध्दतीने काढण्यात येणार आहे. तरी लोहारा तालुक्यातील ग्रामस्थांनी सरपंच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.