लोहारा (Lohara) तालुक्यातील तावशीगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत व बदली झालेल्या शिक्षक-शिक्षिकांचा निरोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
तालुक्यातील तावशीगड जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती तावशीगड यांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापक सुदर्शन जावळे, जे.टी. सगर, जी.एस. माने, आर.एस. सुरवसे, एस.आर. जगताप, आर.पी. ओंवाडकर, एस.डी. मक्तेदार तसेच बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास गोरे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला गावातील सर्व शिक्षक, नागरिक, सरपंच महेश घोटाळे, बाबूसिंग राजपूत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यंकट राजपूत, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रतापसिंह राजपूत, लिंबारी मिटकरी, अतुल फुरडे, भैरव राजपूत, पोपट बिराजदार, उपसरपंच लक्ष्मण माने, गंगाधर मिटकरी उपस्थित होते. शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून जगताप सर यांनी पदभार स्वीकारला असून इतर नवीन आलेले शिक्षकही स्वागत सोहळ्यास उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, गजानन मिटकरी, अमोल थोरात, आकाश मारेकर, मधुकर कोळी यांच्यासह गावातील नागरिक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.






