लोहारा (Lohara) तालुक्यातील सास्तुर (sastur) येथील श्री शांतेश्वर विद्यालयास युनिसेफच्या पथकाने भेट दिली. यावेळी पथकाने शाळेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालय या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रशालेला युनिसेफ या जागतिक संघटनेचे सन २०२५ चे नामांकन प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी युनिसेफच्या पथकाने प्रशालेत भेट दिली. यावेळी युनिसेफ पथकाचे प्रमुख राम कोलगुडे यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन भौतिक सुविधा, परसबाग, विद्यार्थी संख्येप्रमाणे उपलब्ध स्वच्छतागृहे, हँडवॉश स्टेशन, फिल्टर पाण्याची सुविधा, हरित विद्यालय, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन, पाणी तपासणी अहवाल, विद्यार्थ्यांच्या स्वच्छता सवयी, सोलार या सर्व घटकांची तपासणी करून समाधान व्यक्त केले तसेच काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. याप्रसंगी राम कोलगुडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक रवींद्र मुगळे, पर्यवेक्षिका शेवंता कांबळे, उपक्रमशील शिक्षक मदन पाटील, शिवाजी शेळगे, वसंत घंटे, विशाल पवार, हणमंत मुळे, सुशीलकुमार पवार, उमेश जाधव, शेषेराव पवार उपस्थित होते. शाळेच्या प्रगतीबद्दल शांतेश्वर शिक्षण समितीचे अध्यक्ष मुरली पवार व सचिव गोविंद पवार यांनीही समाधान व्यक्त केले व सर्वांचे कौतुक केले.






