अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी जन्मेजय जगताप यांने १९ वर्षाखालील गटात रजत (सिल्व्हर) पदक पटकाविले आहे.
त्याने तालूका, जिल्हा व विभागीय स्तरावर मिळविलेल्या सुवर्ण पदकामुळे त्याला राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने आपली निवड सार्थ करुन दाखविली आहे. तसेच ग्रामीण भागात बॅाक्सिंग सारख्या खेळात आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सतीश इंगळे, प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, प्रा. हणमंत कलबुर्गे, डॉ. विनोद तुंगे, डॉ. व्यंकट चिकटे, मार्गदर्शक रोहण जगाताप, निलेश माने यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. जन्मेजय जगताप याच्या या यशाबद्दल भातागळी गावातील गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.






