भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि. २६) ध्वजारोहण सोहळा पार पडला. सरपंच भाग्यश्री मुरलीधर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने तिरंग्याला सलामी देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ग्रामपंचायतीचे उपसरपंच हुसेन शेख, ग्रामपंचायत सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, नितीन देशपांडे, व्याख्याते गोपाळ माने, पोलिस पाटील बालाजी मातोळे, नारायण गुरव, महेश देशपांडे, शिपाई बबन बाबर, प्रवीण देशपांडे, बिराजदार सर, अमोल कांबळे, एकनाथ देढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावाचा विकास, हाच देशाचा विकास” हा संकल्प करत सर्वांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.








