भारतीय जैन संघटना माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी येथे कार्यरत लोहारा तालुक्यातील मोघा बु येथील ग्रंथपाल नितीन दगडू जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सॉफ्टेक सोल्युशन पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत लोणावळा येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब पानगे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार, चेतन टांगसाळे, प्रा. प्रल्हाद जाधव, किशोर इंगळे उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन जाधव यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने प्रबंध समितीचे सदस्य सुरेशजी साळुंके, प्राचार्य डी.बी. देशमुख, संतोष भंडारी, संजय जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.








